ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथील कनिष्ठ विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘भारतीय संविधान, आपला अभिमान’ या उपक्रमांतर्गत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संविधान पूजनाने झाली. पूजन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मा. प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संविधान उद्देशपत्र वाचन श्री. दत्तात्रय घाटगे यांनी केले.

इ. ११ वी वाणिज्य वर्गातील कु. वसुंधरा कबनुरकर हिने आपल्या प्रभावी भाषणात कायद्यासमोर सर्वजण समान आहेत आणि संविधान सभेतील चर्चेनंतर भारताने धर्मनिरपेक्षतेला स्वीकारले, यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी राज्यघटना निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली. तसेच संविधानाने स्त्रियांना दिलेल्या हक्कांबाबत विद्यार्थिनींना माहिती देत संविधानाप्रती आदर निर्माण करण्याचे आवाहन केले. संविधान दिनानिमित्त प्रभातफेरी आयोजित करून जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे संयोजन श्रीम. सोनाली बोरगावकर, श्री. डी. एम. घाटगे, श्री. सुरजकुमार शिंदे आणि श्री. प्रकाश मुडशी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीम. अनुराधा देशेटवार यांनी तर आभार श्रीम. स्मिता साळुंखे यांनी मानले.

कार्यक्रमाला सर्व शिक्षक, कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्देशपत्र वाचन करताना प्रा.त्रिशला कदम व विद्यार्थीनी 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा