ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत दोन पानटपरी चालकांविरोधात मावा विक्रीप्रकरणी गुन्हे 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत दोन पानटपरी चालकांविरोधात मावा विक्रीप्रकरणी गुन्हे 

इचलकरंजी :

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील दोन वेगवेगळ्या पानटपऱ्यांवर कारवाई करत अवैध सुगंधी तंबाखू, सुपारी व मावा विक्री करताना दोघांना पकडले. टोबॅको ऍक्ट नुसार दोन्ही ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात आरोपी दीपक चंद्रकांत पाटील (रा. इचलकरंजी) हा शाहूनगर गल्ली क्र. ९ येथील एस.पी. पान शॉपमध्ये लेबल किंवा कोणतेही वैधानिक इशारे न लावता मावा, सुपारी व कच्च्या साहित्याची विक्री करीत असताना आढळला. पोलिसांनी १९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या प्रकरणात उत्तम शंकर जठारे (रा. कबनूर) हा कबनूरच्या रुई रोडवरील गुडलक पान शॉपमध्ये अवैध मावा विकत असल्याचे आढळले. या ठिकाणी १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवाया फिर्यादी पोलीस कर्मचारी प्रमोद चव्हाण यांनी केल्या असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा