ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत ‘शिव शाहू विकास आघाडी’ची घोषणा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत ‘शिव शाहू विकास आघाडी’ची घोषणा

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने *‘शिव शाहू विकास आघाडी’*च्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना शशांक बावचकर यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून २२८ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १९१ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात प्रभागनिहाय सक्षम उमेदवारांचा विचार करून उमेदवार निश्चिती केली जाईल. तसेच इचलकरंजी शहरातील मूलभूत प्रश्न व प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराविरोधात आघाडीच्या माध्यमातून संघर्ष केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिव शाहू विकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मँचेस्टर आघाडी, माकप, मनसे, आप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी व लाल निशान पक्ष यांचा समावेश असल्याचे जाहीर करण्यात आले.

सागर चाळके यांनी शहराचा कारभार आमदार व आयुक्तांच्या मनमानीने सुरू असल्याची टीका करत, पारदर्शक कारभार करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिव शाहू विकास आघाडीला नागरिकांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. मदन कारंडे यांनी सर्व पक्ष एकत्रितपणे निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार राजीव आवळे यांनी महायुतीतील नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसून शिव शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. तर माजी आमदार राजु बाबा आवळे यांनी आघाडीचे उमेदवार जनतेचे सेवक म्हणून काम करत सर्व स्तरांतील समस्या सोडवतील व प्रशासनावर अंकुश ठेवतील, असे स्पष्ट केले.

चिन्हाबाबत माहिती देताना प्रकाश मोरबाळे यांनी मागणीनंतर कपबशी, गॅस सिलेंडर किंवा शिट्टी या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह मिळून त्यावर निवडणूक लढवली जाईल, असे सांगितले.

या पत्रकार परिषदेस रणजित जाधव, मलकारी लवटे, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, रवी गोंदकर, हेमंत वणकुद्रे, वसंत कोरवी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिव शाहू विकास आघाडीच्या  अनावरण प्रसंगी माजी आ.राजुबाबा आवळे,मा.आ.राजीव आवळे,शशांक बावचकर,सागर चाळके, मदन कारंडे,मलकारी लवटे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा