ICHMH51NEWS.IN
9921600800

सन्मानजनक जागा द्या अन्यथा स्वतंत्र लढणार-आम आदमी पार्टीचा विकासकामाचा अजेंडा जाहीर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सन्मानजनक जागा द्या अन्यथा स्वतंत्र लढणार-आम आदमी पार्टीचा विकासकामाचा अजेंडा जाहीर

इचलकरंजी —
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) इचलकरंजीने कामकेंद्रित, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख असा स्पष्ट निवडणूक अजेंडा जाहीर केला आहे. “फक्त घोषणा नाहीत, काम करून दाखवणारा अजेंडा” या भूमिकेतून शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या अजेंड्यात दर्जेदार व आधुनिक शिक्षण व्यवस्था, सर्वांसाठी सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा, ट्रॅफिकमुक्त व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर, नागरिक सेवा घरपोच व पारदर्शक, तसेच खड्डेमुक्त, सुरक्षित व टिकाऊ रस्ते हे प्रमुख मुद्दे समाविष्ट आहेत.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, इचलकरंजीच्या विकासासाठी घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाला प्राधान्य दिले जाईल. शिव शाहू विकास आघाडीकडे ५ प्रभागांतील ६ जागांची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी किमान ३ जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. सध्या १५ जागांवर उमेदवार तयार असून, आणखी उमेदवार वाढण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संघटक संदीप देसाई, शहराध्यक्ष वसंत कोरवी, उपाध्यक्ष यशवंत भंडारे, प्रचार प्रमुख प्रकाश सुतार यांच्यासह मा. उपाध्यक्ष रावसो पाटील, अरुण गळतगे, संतोष भागवत, अनिता बडे, शब्बीर शिरोळे, मोजेस आवळे, बाबुराव माळी व सर्व आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देसाई, वसंत कोरवी, प्रकाश सुतार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा