ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा शनिवारी वस्त्रनगरीत रोड शो

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा शनिवारी वस्त्रनगरीत रोड शो

इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणूकीतील महायुती उमेदवारांच्या प्रचार शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वस्त्रनगरी इचलकरंजीत येणार आहेत, राज्यात सर्वप्रथम ते महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजीत येत असून शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे, असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी भागाभागात नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराचा श्रीगणेश केला आहे. या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शनिवार ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरंजीत रोड शो आयोजित करण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून या रोड शोचा प्रारंभ होईल. तेथून श्री शिवतीर्थ, श्री शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक असा रोड शो होईल. याचठिकाणी सांगता होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता आणि नियमांचे काटेकोर पालन करणेसंदर्भात शहर भाजपा कार्यालयात बैठक झाली.
बैठकीस प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हा चिटणीस शेखर शहा, प्रकाश दत्तवाडे, तानाजी पोवार, इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, पूर्व मंडल महिला अध्यक्षा सौ. सीमा कमते, पश्चिम मंडल अध्यक्षा सौ. सपना भिसे, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, सौ. अलका स्वामी, सौ. रमा फाटक, आदींसह सर्वच प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.

भाजप कार्यालयात बैठकीदरम्यान छायाचित्र.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा