ICHMH51NEWS.IN
9921600800

दीपक पाटलांचे बंड भाजपने केले थंड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दीपक पाटलांचे बंड भाजपने केले थंड

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६ मधील इच्छुक उमेदवार दीपक अशोक पाटील यांनी अखेर निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या पत्नी सौ.अनुराधा दीपक पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना,पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याच्या हट्टामुळे शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याचा खुलासा पाटील यांनी केला.
त्यांनी म्हटले आहे की, अपक्ष किंवा शिव–शाहू आघाडीत जाण्याचा पर्याय त्यांच्या समोर असला तरी, गेल्या २८ वर्षांच्या पक्षनिष्ठेमुळे आणि कौटुंबिक सल्ल्यामुळे त्यांनी तो पर्याय स्वीकारला नाही. आईच्या सल्ल्यानुसारच इतर कोणत्याही पक्षात न जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, स्वप्नील आवाडे, सुनील महाजन, सुनील पाटील, विठ्ठल चोपडे आणि रिषभ जैन आदींशी झालेल्या बैठकीत दोन तास चाललेल्या चर्चेनंतर पुढील आश्वासने देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले त्यामध्ये
पाच वर्षांसाठी (स्वीकृत) नगरसेवक
महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्षपद
फेरीवाल्यांच्या प्रलंबित कामांना प्राधान्य याचा समावेश आहे.
पक्षनिष्ठा आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करूनच सहकाऱ्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विक्रमनगर परिसरातील नागरिक आणि फेरीवाला बांधवांसाठी २४ तास कार्यरत राहण्याची हमी त्यांनी दिली.
“मी थांबलो नाही आणि थांबणारही नाही,” असा दृढनिश्चय व्यक्त करत, शहरातील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा