ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत २२ उमेदवारांची माघार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत २२ उमेदवारांची माघार

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ संदर्भात दाखल झालेल्या वैध अर्जांपैकी १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत एकूण २२ उमेदवारांनी आपली उमेदवारी स्वेच्छेने मागे घेतली असल्याची अधिकृत नोंद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
माघार घेणाऱ्यांमध्ये प्रभाग १ मधील मालती रामचंद्र लोखंडे, विनायक लालासो राणे, दिपाली सतीश कोकणे, सुरेखा कृष्णनाथ शिंदे, लक्ष्मी उदयसिंग पाटील, दादासो गुंडू भाटले; प्रभाग ३ मधील विनोद शंकर चव्हाण; प्रभाग ३ मधील सरिता सुरज चौगुले, हर्षदा संतोष कुपटे, मानसी मनोज हिंगमिरे प्रभाग ६ मधील शारदा सीताराम महाजन, सारिका विठ्ठल चोपडे; प्रभाग ८ मधील वर्षा हेमंत वरुटे, स्मिता पारसनाथ घाट; प्रभाग ९ मधील वाजीद शाहबुद्दीन सावनुर, वर्षा राहुल खंजिरे; प्रभाग ११ मधील सारिका प्रदीप धुत्रे, रेश्मा दीपक डाके, श्वेता राजू बोंद्रे; प्रभाग १२ मधील संतोषी संजय कांबळे, सुनिता प्रकाश मोरबाळे तसेच प्रभाग १६ मधील बाळासाहेब गणपती कलागते यांचा समावेश आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा