ICHMH51NEWS.IN
9921600800

बंडखोरी मोठ्या प्रमाणात शमली; भाजपला दिलासा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बंडखोरी मोठ्या प्रमाणात शमली; भाजपला दिलासा

इचलकरंजी:
महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरीची चिन्हे तीव्र होत असतानाच खालील उमेदवारांनी अधिकृतरीत्या माघार घेतल्याने भाजपसमोरील पेच मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा मार्ग सुकर झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आज माघारीच्या अंतिम दिवशी बाळकृष्ण तोतला, निता दीपक गांधी, ऋषिकेश गौड, उमा महादेव गौड (शिवसेना), प्रणिता गणेश पोवार, अमित गाताडे (राष्ट्रवादी), राजेश रजपूते, निता दत्तात्रय पाटील, संदीप खोत, अश्विनी कुबडगे, अमित खानाज, कपिल शेटके, शृंखला परदेशी, प्रदीप मळगे, संजय बड़े, लक्ष्मी बड़े, संध्या बनसोडे आणि साहिल कलावंत यांनी माघार घेतली.या माघारीनंतर अनेक प्रभागांमध्ये त्रिकोणी लढतींचा धोका टळला असून पक्षांतर्गत नाराजीही काही प्रमाणात निवळल्याचे सूत्रांनी सांगितले.
या घडामोडींमध्ये उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आ. राहुल आवाडे आणि जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी विशेष पुढाकार घेत चर्चा केली.

उमा महादेव गौड यांनी माघार घेत मेघा भोसले यांना पाठिंबा दिला

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा