शिवाजीनगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
दोन सराईत घरफोडी चोरांना अटक; ६.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त.
इचलकरंजी :
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कारवाई करत घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला असून दोन सराईत आरोपींना ताब्यात घेऊन सुमारे ६ लाख ६४ हजार २८६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे शहरात घडलेल्या मोठ्या घरफोडी चोरीचा पर्दाफाश झाला आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी किशोर रवीलाल पटेल (रा. गणेशनगर गल्ली नं. १, इचलकरंजी) यांनी तक्रार दिली होती.
दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता ते २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान, डेक्कन चौक ते पंचगंगा फॅक्टरी रोडवरील ‘श्री जलाराम ट्रेडर्स’ या दुकानाच्या पाठीमागील पत्र्याच्या गोडावूनमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून Parryware कंपनीचे विविध मॉडेलचे पितळी नळ, एकूण किंमत ६,३६,२५५ रुपये, चोरी केल्याची घटना घडली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत मुकेश गणपती जाधव (वय ३९, मूळ रा. सांगली, सध्या रा. शाहूनगर चंदूर कदम मळा, ता. हातकणंगले) व उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव (वय ४३, मूळ रा. उंचन्नहट्टी, ता. खानापूर, जि. बेळगाव, सध्या रा. शाहूनगर चंदूर कदम मळा) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळवली असून त्यांच्याकडून ५,१५,२८६ रुपये किमतीचे Parryware कंपनीचे पितळी नळ तसेच
१,५०,००० रुपये किमतीची वॅगन-आर चारचाकी वाहन, असा एकूण ६,६४,२८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासात उघड झाले की अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत घरफोडी गुन्हेगार असून त्यांच्यावर खालापूर, पोयनाड, कुरुंदवाड, शिरोळ, राधानगरी, मुरगूड, कवठेमहांकाळ, जयसिंगपूर, वडगाव आदी विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने, सहा. फौजदार रावसाहेब कसेकर तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सुनिल बाईत, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चव्हाण, गणेश सनदी व सुकुमार बरगाले यांनी यशस्वीपणे पार पाडली.
सदर आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करत आहेत.
मुद्देमालासह आरोपी व पोलीस अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







