महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यास भेट कार्यक्रम
पोलीस कामकाजाची प्रत्यक्ष माहिती; ८० ते ९० विद्यार्थ्यांचा सहभाग
इचलकरंजी :
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आज गुरुवार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यास शैक्षणिक भेट दिली.
या भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, शस्त्रांबाबत माहिती, क्राईम विभाग, गोपनीय विभाग, कारकून (क्राईम) विभाग, सीसीटीएनएस विभाग तसेच डायल ११२ या आपत्कालीन सेवेसंदर्भात सविस्तर व प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यासोबतच महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे महत्त्व, पोलीस दलाची भूमिका व समाजातील जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस बँड पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात वाद्य सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
सदर उपक्रमात व्यंकटराव हायस्कूलचे सुमारे ८० ते ९० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेचे कार्य, शिस्त व जबाबदारी यांची प्रत्यक्ष ओळख मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
हा उपक्रम शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
पोलीस ठाण्यास भेट देताना विद्यार्थी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







