ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीची सुकन्या गंधाली पारनाईक हिला भरतनाट्यम विशारद पदवी प्राप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीची सुकन्या गंधाली पारनाईक हिला भरतनाट्यम विशारद पदवी प्राप्त

इचलकरंजी:
नृत्याची तांत्रिक अचूकता, हस्तमुद्रा, तालबद्धता, भाव-अभिनय तसेच सादरीकरणातील शिस्त या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत इचलकरंजीची सुकन्या कु. गंधाली गजानन पारनाईक हिने शास्त्रीय नृत्यप्रकार असलेल्या ‘भरतनाट्यम’ नृत्यशैलीतील ‘विशारद’ पदवी संपादन केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कला क्षेत्रात तिचे कौतुक केले जात आहे.
विशारद ही भरतनाट्यममधील एक महत्त्वाची पदवी मानली जाते. बालपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या गंधालीने सातत्यपूर्ण सराव, गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या कलेवरील निष्ठेमुळे हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल गुरूजन, कुटुंबीय आणि कला रसिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. या यशामुळे तिला मुंबई येथील अंजनी अरुण हेरीटेज मिडीया यांच्याकडून पुढील प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
गंधाली हिने प्रारंभापासून इचलकरंजीतील नृत्य विशारद सौ. सायली होगाडे यांच्याकडे भरतनाट्यम व कथ्थक चे धडे घेतले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम व कथ्थकसाठीच्या परीक्षा दिल्या. तर तीन वर्षांपासून ती गुरु स्वरदा भावे आणि गुरु स्वाती दातार यांचे मार्गदर्शखाली प्रशिक्षण घेत होती. या सर्वांचे तिला विशारद होण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन लाभले. पुणे येथे झालेल्या परीक्षेमध्ये तिने उच्चतम कामगिरी करत विशारद ही पदवी प्राप्त केली. तिच्या या यशामध्ये तिच्या सर्व गुरुंसह वडील गजानन पारनाईक, आई सौ. अपूर्वा पारनाईक यांचेही मोलाचे पाठबळ लाभले.
कोरोनाच्या महासंकट काळात चिंता आणि लॉकडाऊनमुळे येणारा कंटाळा दूर होऊन काही काळ आनंदात न्हाऊन निघावा या संकल्पनेतून शासन निबंधांचे पालन करत सोशल डिस्टन्सचे पालन करत घरच्या टेरेसवर कु. गंधाली गजानन पारनाईक आणि कु. सानिका दिनेश फडके यांनी कथ्थक-भरतनाट्यम आणि शास्त्रीय व नाट्य संगीताच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसह शहरवासियांचे मनोरंजन करून घरात बसून आलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला होता. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा