अजितदादांच्या अकाली निधनाने वस्त्रोद्योगाचे पाठबळ हरपले
इचलकरंजी २९ :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झालेमुळे वस्त्रोद्योग क्षेत्राची व खासकरून यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देणारा नेता हरपला अशी भावना दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
नेहमी महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग व यंत्रमाग उद्योगाला अर्थमंत्री असणाऱ्या नामदार अजितदादा पवार यांनी पाठबळ दिलेले आहे. वेगवेगळ्या योजना करताना नेहमीच ते सकारात्कम असत. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाकडे त्यांचे खास लक्ष असायचे. वस्त्रोद्योगातील कोणताही प्रश्न घेऊन गेल्यास त्वरीत त्यामध्ये लक्ष घालून तो प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा कल असायचा किंवा इतर विभागाकडे असेल तर ते लगेचच फोन करून संबंधीत मंत्र्यांना सुचना करीत. यंत्रमाग उद्योगाचा रू. १ व ७५ पैशांचा अतिरिक्त वीज सवलतीचा निर्णय प्रलंबित होता. तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्वरीत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधीत सचिवांना दिल्या व दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या कॅबिनेट मिटींगमध्ये तो विषय संमत करून घेणेविषयी सांगितले. यानंतरही संबंधीत अधिकाऱ्यांनी ती योजना फक्त ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असेल असा मसुदा तयार केला होता. त्यासंदर्भात पुन्हा दादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना झापले व कायमस्वरूपी ही योजना चालू राहील असे ड्राफटींग करण्यासंदर्भात आदेश दिले असे इचलकरंजीवर नेहमी प्रेम करणारे विविध विषयात उदा. झोपडपट्टीचा विषय असो, पाण्याचा विषय असो, आ.जी.एम.चा विषय असो, झेड.एल.डी. च्या विषयासंदर्भात त्यांनी नेहमीच इचलकरंजीला झुकते माप दिलेले आहे. त्याचबरोबरीने कांही महिन्यांपूर्वी झालेल्या भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धेसाठी शासनाकडून भरीव आर्थीक तरतूद करून इचलकरंजीला या स्पर्धा व्हाव्यात यासाठी मदत केली व बक्षिस वितरण समारंभाला स्वत: हजर राहिलेच आणि फाईनलचा सामना ग्राऊंडवर बसुन त्यांनी पाहिला. या आठवणी ताज्या असताना मा.अजितदादांचे अचानक निघून जाणे हृदयविदारक आहे. वस्त्रोद्योगाकडे डोळस नजरेने पाहणारा व नेहमी पाठिशी राहणारा नेता हरपल्याची भावना संपूर्ण इचलकरंजी करांची आहे. त्यांना इचलकरंजीतील तमाम यंत्रमागधारकांच्याकडून व दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







