मधुयोग अकॅडमीच्या साधकांचा ५०२ सूर्यनमस्कारांचा वैयक्तिक विक्रम
इचलकरंजी :
रथसप्तमीचे औचित्य साधून मधुयोग अकॅडमीच्या वतीने पॉवरलूम असोसिएशन बिल्डिंग, इचलकरंजी येथे भव्य सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहाटे ६ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सौ. सुनिता पाटील, सौ. राजश्री जोशी, सौ. शकुंतला बांगड, डॉ. शैलजा कुंभार, सौ. पद्मा बांगड, श्री. विनोदकुमार उपाध्याय, श्री. विश्वास माने सर, श्री. आकाश धुमाळ सर, श्री. अशोक मकोटे (संचालक, मधुयोग अकॅडमी) व सौ. सविता मकोटे (अध्यक्ष, मधुयोग अकॅडमी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या उपक्रमात एकूण ७५ साधकांनी सहभाग घेतला असून सर्व साधकांनी मिळून १५,२१४ सूर्यनमस्कार पूर्ण केले. यामध्ये चंद्रशिला अकॅडमीच्या २४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विशेष बाब म्हणजे १५ हून अधिक साधकांनी वैयक्तिकरित्या ५०२ सूर्यनमस्कारांचा टप्पा यशस्वीरीत्या पार करून विक्रम नोंदविला.
सिनिअर गटामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ. सुनिता पाटील, सौ. संगीता सूर्यवंशी, सौ. राजश्री जोशी व श्री. प्रकाश साठे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच राजेश बांगड, रुद्र पारीक, क्रिश जोशी, अमोल होगाडे, सौ. निता टुवाणी, सौ. रेखा निमणकर, सौ. अनुराधा धुत्रे व सौ. सुचिता कास्लीवाल यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स’ ट्रॉफी देण्यात आल्या.
चंद्रशिला अकॅडमीच्या वतीने अरुण प्रजापती, प्रणव कलबुर्गी, मयंक शर्मा, मधुरा भोपळे, दिपा पाटील, गुडिया यादव, नुफिया मुजावर व अजय जसवाल यांना विशेष कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. स्पर्धात्मक क्रमवारीत सौ. जयश्री लाड (प्रथम), कैलास कांबळे (द्वितीय) व कुमारी भावना रावळकर (तृतीय) यांना प्रमुख पाहुणे सौ. व श्री. अभिषेक वाळवेकर, सौ. व श्री. ओंकार सुर्वे व सौ. व श्री. प्रशांत सपाटे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी विभागासाठी राहुल कुंभार व राजेंद्र कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच श्री. अनिल डाळ्या व डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. पायल मुथा यांनी उत्कृष्टरीत्या केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







