ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  संत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपमहापौर अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे तसेच उपायुक्त विद्या कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपस्थित मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या सामाजिक कार्याचा आणि समाजप्रबोधनाच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
कार्यक्रमास नगरसेविका अरुणा बचाटे, प्रमोद बचाटे, नगरसचिव राहुल पोटे, सहायक आयुक्त नितीन बनगे, सहायक करसंकलन अधिकारी दीपक खोत, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, सदाशिव जाधव, अजय सुतार, संजय कांबळे, प्रवीण बुगड, महादेव देसाई आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करताना महापौर उदय धातूंडे,उपमहापौर अनिल डाळ्या,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा