मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
इचलकरंजी
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनि कॉलेज मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (गोविंदराव ज्युनिअर कॉलेजचे माजी उपप्राचार्य) मराठी विषयाचे गाढे अभ्यासक मा. श्री अशोक दास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. प्रमुख पाहुणे, प्रशालेचे सर्व प्रशासक वर्ग यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिमेचे पूजन आणि गंगामाई प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रशालेच्या संगीत शिक्षिका सौ.रानडे आणि संगीत मंचाच्या विद्यार्थीनीनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना मराठी भाषेला प्रदीर्घ असा इतिहास आहे आणि तो आपण जपला पाहिजे असे मत मांडून मराठी दिनाच्या शुभेच्छा पर्यवेक्षक एस एस कोळी यांनी दिल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए एस काझी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका मराठी दिनाच्या विभाग प्रमुख आर.. जे. निउंगरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचा गौरव सांगताना भाषा समृद्ध होण्यासाठी कुसुमाग्रजांचा मराठी भाषेचा इतिहास ओव्या ,अभंग , नाटक ते संतांच्या थोरवीपर्यंतचा प्रवास विद्यार्थिनींच्या मनापर्यंत पोहोचवला. यातूनच विद्यार्थिनींनी वाचनाची आवड जपावी आणि आपल्या भाषेचा गुणगौरव वाढवावा अशा भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या स्वनिर्मित आई या कवितेचे वाचन केले. मराठी विभागाच्या एस पी धातुंडे मॅडम यांनी बक्षीस पात्र विद्यार्थिनींच्या यादी चे वाचन केले.
मराठी दिनाचे औचित्य साधून प्रशालेमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ,”पूज्य साने गुरुजींच्या श्यामची आई या संस्कारक्षम कादंबरीवर” संस्कार परीक्षा स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थिनींचे प्रमुख पाहुणे व प्रशालेतील मान्यवर यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा व प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस.काजी. यांनी मराठी भाषा ही फक्त भाषा नसून ती एक आपल्याला लाभलेली संस्कृती आहे तिचा सन्मान आपण केला पाहिजे अशा भावना व्यक्त करून मराठी दिनाच्या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापिका व्ही.एस. लोटके यांनी मानले. सूत्रसंचालन एस .एच. मुजावर यांनी केले.
सदर कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस काजी उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षिका एन. एम. कांबळे, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रा अशोक दास यांचा सन्मान करताना मुख्याध्यापिका ए.एस.काझी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







