ICHMH51NEWS.IN
9921600800

विश्व मराठी साहित्य संमेलनात आपटे वाचन मंदिराचा सन्मान    

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विश्व मराठी साहित्य संमेलनात आपटे वाचन मंदिराचा सन्मान    

   इचलकरंजी
 येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराचा नाशिक येथे कविवर्य कुसुमाग्रज नगरीत सुरू असलेल्या चौथ्या मराठी विश्व संमेलनात सन्मान करण्यात आला.  महाराष्ट्र शासनातर्फे मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणारी संस्था म्हणून डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आपटे वाचन मंदिरास प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या  पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या अध्यक्ष सुषमा दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रुपये दोन लक्ष, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मा. सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या भाषणात आपटे वाचन मंदिराच्या कार्याचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपटे वाचन मंदिराने 70 हजाराहून अधिक ग्रंथांचे जतन केले असल्याचे आवर्जून नमूद केले. यावेळी शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे साहित्य भूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना देण्यात आला. विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांना डॉक्टर दिलीप धोंडगे यांना व्यक्ति गटात   डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार देण्यात आला. मराठी भाषा संवर्धक व्यक्तींसाठीचा मंगेश पाडगावकर पुरस्कार विनोद कुलकर्णी व संस्था पुरस्कार कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी यांना देण्यात आला. नांदेडच्या निर्मल प्रकाशना ला श्री. पु. भागवत प्रकाशक पुरस्कार देण्यात आला. राज्य शासनाच्या विविध साहित्य पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अन्न व  नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. आपटे वाचन मंदिराचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे, कार्यवाह प्रा. मोहन पुजारी, संचालक माया कुलकर्णी हे ग्रंथालयातर्फे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सुषमा दातार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा