ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरात वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर वाहतुक शाखेची कारवाई,८ लाख ३० हजार दंड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरात वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर वाहतुक शाखेची कारवाई,८ लाख ३० हजार दंड
इचलकरंजी
इचलकरंजी वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून प्रशांत निशाणदार हे कार्यभार स्वीकारलेनंतर इचलकरंजी शहरात वाहतुकीस शिस्त लावण्याकरीता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या त्यामध्ये भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, विना नंबर प्लेट वाहन चालविणे, सीट बेल्ट न वापरणे, सिग्नल जंप करणे, वन वे मधुन वाहन चालविणाऱ्या तसेच बेशिस्त वाहन पार्क करणा-या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यामध्ये अशा एकुण १०५७ वाहन धारकांवर व्यापक स्वरुपात कारवाई करण्यात आली त्यामध्ये वाहन धारकावर विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करुन ८,३०,२५०/- रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या एकुण ३८ कारवाई करुन त्यांचेवर गांवभाग, शिवाजीनगर व शहापुर पोलीस ठाणेत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
      तसेच शहापुर भागात टेम्पा मध्ये धोकादायक रित्या बीम भरल्यामुळे अपघात होऊन त्यात एक इसम मयत झालेला आहे व एक गंभीर जखमी झालेला आहे. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांनी दि. ३१/०७/२०२४ ते दि.०६/०८/२०२४ दरम्यान ड्राईव्ह घेवून मोटार वाहन कलम २०२ प्रमाणे कारवाई करण्याबाबत आदेशीत केल्यानंतर व भविष्यात अशा प्रकारे अपघात होऊ नये याकरीता धोकादायक रित्या बीम भरुन त्याची वाहतुक करणाऱ्या एकुण ८१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ५४५००/- रुपये इतका दंड वसुल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाईच्या अनुषंगाने आम्ही दि.०२/०८/२०२४ व दि.०६/०८/२०२४ रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, इचलकरंजी विभाग इचलकरंजी यांच्या अध्यक्षतेखाली सायझिंग असोशिएशन व टेम्पो चालक व मालक संघटनेची बैठक घेवून त्यांना नियम समजावून सांगतले आहेत. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल अशा सुचना दिलेल्या आहेत. तसेच यापुढेही वाहतुकीस शिस्त लागावी व वाहतुक सुरळीत रहावी, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊन अपघात घडु नयेत याकरीता सदरच्या कारवाई मध्ये सातत्य ठेवुन कारवाई चालुच राहणार आहे. त्यामुळे इचलकरजी शहरातील सर्व नागरीकांना वाहतुक शाखेतर्फे अवाहन करणत येते की, इचलकरंजी शहरातील वाहतुकीस शिस्त लागण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व कोणीही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये.
विशेष आवाहन
वाहतुक शाखेच्या वतीने सर्व वाहन धारकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या वाहनावर असणारा पेंडींग दंड हा वाहतुक शाखेत किंवा जवळच्या वाहतुक अंमलदार यांचे कडे दंड भरण्यात यावा जेणेकरुन कोर्टात जाण्याचा कटु प्रसंग येणार नाही.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा