वीज दुरुस्तीमुळे आज इचलकरंजीत पाणीपुरवठा विस्कळीत
इचलकरंजी :
मजरेवाडी व पंचगंगा जॅकवेल येथील विद्युत पुरवठा दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी (दि. ६ एप्रिल) शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मजरेवाडी व पंचगंगा जॅकवेल येथील पाणी उपसा पूर्णपणे ठप्प राहणार असून शहरात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.
या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली असून नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा नियमित करण्यात येईल, असेही पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





