ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत प्रबोधन वाचनालयात जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत प्रबोधन वाचनालयात जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी :
जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने समाजवादी प्रबोधिनीच्या वाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्याबरोबरच मराठी संतसाहित्य, कादंबरी, कथा, ललित, काव्य, चरित्र, इतिहास, विज्ञान अशा विविध प्रकारातील अनेक पुस्तके मांडण्यात आली होती.
या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी राजन मुठाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पुस्तकांचे महत्त्व पटवून देणे आणि वाचनाची आवड निर्माण करणे हा जागतिक पुस्तक दिनाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनातून तो उद्देश साध्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुस्तकांच्या वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत असल्याने प्रत्येकाने सार्वजनिक वाचनालयाचा सभासद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सौदामिनी कुलकर्णी, कविता डांगरे, मानसी तगारे, अशोक माने, दिलीप लोहार, संदीप पाटील, जनार्दन माने, सुयश तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या ग्रंथप्रदर्शनाला वाचनालयाच्या सभासदांसह वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेताना वाचक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा