ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत लोकशाहीर संभाजी भगत यांचा आज जाहीर सत्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत लोकशाहीर संभाजी भगत यांचा आज जाहीर सत्कार

इचलकरंजी :
सातारा येथे होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या लोकशाहीर संभाजी भगत यांचा जाहीर सत्कार समारंभ आज बुधवार, दिनांक २९ रोजी इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाहीर संभाजी भगत हे शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर आधारित गाणी व पोवाडे सादर करत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधनाची चळवळ जिवंत ठेवणारे प्रभावी शाहीर म्हणून ओळखले जातात. विद्रोही विचारांचे प्रतिनिधित्व करणारे शाहीर म्हणून त्यांची खास ओळख निर्माण झाली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राज्यभर त्यांचा सत्कार होत असून, त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सत्कार समारंभात प्राध्यापक राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून, माजी आमदार राजीव आवळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच विरोधी पक्ष नेते उदयसिंह पाटील, नगरसेविका क्रांती आवळे, माजी नगरसेवक शशांक बावचकर आणि कॉम्रेड धनाजी गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता समाजवादी प्रबोधिनी येथे होणाऱ्या या कार्यक्रमास इचलकरंजी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बजरंग लोणारी, किरण माळी, युसुफ तासगावे आणि रिटा रॉड्रीग्युज यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा