इचलकरंजीत जनगणना २०२७ साठी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात
इचलकरंजी :
भारताची जनगणना २०२७ पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील पर्यवेक्षक व प्रगणक यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली आहे. शहरासाठी एकूण ४९६ ब्लॉक निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान घरगणना होणार आहे.
या कामासाठी ५११ प्रगणक व ८७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टप्प्यांत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, पहिले सत्र २७ ते २९ एप्रिल, दुसरे २ ते ४ मे आणि तिसरे ६ ते ८ मे दरम्यान होणार आहे. डीकेएएससी महाविद्यालय, आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, डीकेटीई इंग्लिश मीडियम स्कूल व बालाजी हायस्कूल येथे प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रशिक्षणादरम्यान जनगणना संचालनालयाचे रमेश भोसले व मुकेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त नंदू परळकर, रोशनी गोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जनगणणेबाबत मार्गदर्शन करताना अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





