आमदारांनी नगररचना योजनेतील मिळकतधारकांची दिशाभूल थांबवून प्रश्न निकाली काढावा-प्रकाश मोरबाळे
इचलकरंजी :
नगररचना योजना क्रमांक १ व २ मधील मिळकतधारकांची आमदारांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केला आहे. सुमारे ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेत ११९३ प्लॉट्स असून सध्या सुमारे ३५ हजार मिळकती अस्तित्वात आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
योजनेतील भुखंडांचे फेरबदल (व्हेरीएशन) करण्यासाठी खाजगी मक्तेदार ‘सारथी इंजिनिअर्स, पुणे’ यांच्यामार्फत भूमापन अधिकाऱ्यांसह मोजणी करण्यात आली. मात्र नगररचना व महसूल विभागातील समन्वय अभावी गेली दहा वर्षे प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, विशेष पथकावर आतापर्यंत सुमारे २.७० कोटींचा खर्च झाल्याचेही मोरबाळे यांनी सांगितले.
मिळकतधारकांना मालकी हक्कपत्र, नकाशे व कब्जेपट्टी न मिळाल्याने खरेदी-विक्री, बांधकाम परवाने व कर्जप्रकरणे अडकली आहेत. त्यामुळे तयार नकाशांना मंजुरी देणे किंवा शासनाच्या आदेशाने भूमापन खात्याकडून मोजणी करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






