दि इचलकरंजी बार असोसिएशनतर्फे मा. न्यायाधीश जी. एम. नदाफ यांचा सत्कार
इचलकरंजी –
इचलकरंजी कोर्टातील दिवाणी न्यायाधीशसो, वरिष्ठ स्तर, जी.एम. नदाफसा यांनी नुकतीच भारती विद्यापीठातून पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे. “मुस्लिम महिलांशी संबंधित तलाक विषयी कायदे आणि त्यांचा पोटगीवर होणारा परिणाम एक चिकित्सक अभ्यास” हा त्यांचा कायदा क्षेत्रातील पी.एच.डी.चा विषय होता. दि इचलकरंजी बार असोसिएशनचे वतीने मे. जिल्हा व सत्र न्यायाधीशसो-1 श्री. मिलींद भोसलेसो यांचे अध्यक्षतेखाली व इचलकरंजी येथील मा. न्यायाधीशसो पी.एन. रोकडे, मा. न्यायाधीशसो आर.डी. खराटे मॅडम, मा. न्यायाधीशसो डी.बी. साठे, मा. न्यायाधीशसो ए.एम. गायकवाड मॅडम, मा. न्यायाधीशसो एम.एस. गावडे मॅडम, मा. न्यायाधीशसो ए.आर. कुलकर्णी यांचे उपस्थितीत सिनिअर अॅड. एम. डी. जमादारसो यांचे हस्ते मा. न्यायाधीश श्री. जी.एम. नदाफसो यांचा सत्कार करणेत आला.
यावेळी मा. नदाफसा यांनी ट्रीपल तलाकबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या शायरा बानो केसमध्ये न्यायनिर्णयामुळे तिहेरी तलाक बंद करणेत आला असला तरी देखील तलाकचे इतर मार्ग उपलब्ध आहेत. तिहेरी तलाक या न्यायनिर्णयाचा उपयोग योग्य पद्धतीने होऊन मुस्लिम महिलांच्या जीवनामध्ये अडथळे येणार नाहीत आणि त्या अनुषंगाने काही नविन कायदे येणे जरुरीचे आहे, असे मा. नदाफसा यांनी सांगितले.
यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे कार्यकारिणीचे नवनियुक्त सदस्य अॅड. अर्चना कुलकर्णी (ओगले) व अॅड. किर्ती जैंद यांचा सत्कार करणेत आला. यावेळी सिनिअर अॅड. इरफान जमादार, अॅड. डी.एम. लटके, अॅड. राहुल काटकर व अॅड. श्रद्धा आरेकर, कोल्हापूर जिल्हा नोटरी संघाचे अध्यक्ष सिनिअर अॅड. अमित सिंग यांचे प्रयत्नातून व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे वतीने विविध विषयावर व स्पर्धा परिक्षामध्ये भाग घेणारे वकिलांना व सभासदांना मार्गदर्शन करणेसाठी लेक्चर सिरीजचा शुभारंभ मा. जिल्हा न्यायाधीशसो मिलींद भोसले यांचे हस्ते करणेत आला. सदर कार्यक्रमास दि इचलकरंजी बार असोसिएशनचेसदस्य मोठ्या संख्येने हजर होते.
सदर सत्कार समारंभाचे नियोजनास दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, अॅड. धीरज पारख, अॅड. भरत जोशी, क्लार्क प्रविणभाऊ फगरे व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.
अँड एम डी जमादार यांच्या हस्ते न्यायाधीशसो नदाफ यांचा सत्कार करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




