ICHMH51NEWS.IN
9921600800

अंगारकी संकष्टी निमित्त इचलकरंजीहून गणपतीपुळे दर्शनासाठी एसटीची जादा बससेवा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंगारकी संकष्टी निमित्त इचलकरंजीहून गणपतीपुळे दर्शनासाठी एसटीची जादा बससेवा

इचलकरंजी :
अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) इचलकरंजी आगाराकडून ५ मे २०२६ रोजी गणपतीपुळे दर्शनासाठी जादा बससेवा सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर विभागांतर्गत ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इचलकरंजी–गणपतीपुळे–इचलकरंजी या मार्गावर दोन बस सोडण्यात येणार आहेत. पहिली बस सकाळी ५.०० वाजता इचलकरंजी बसस्थानकातून सुटून दुपारी ३.३० वाजता परत येणार आहे. तर दुसरी बस सकाळी ६.०० वाजता सुटून रात्री १०.४५ वाजता इचलकरंजीत दाखल होणार आहे.
या प्रवासासाठी पूर्ण तिकीट दर ७४३ रुपये तर अर्धे तिकीट ३७६ रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ‘अमृत’ योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा (नियम व अटी लागू) देण्यात येणार आहे.
याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, गट बुकिंगसाठीही बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा