ICHMH51NEWS.IN
9921600800

दरवाढीवर वहिफणी असोसिएशन ठाम पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट; ४ वर्षे ४ महिन्यांनंतर निर्णय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दरवाढीवर वहिफणी असोसिएशन ठाम

पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट; ४ वर्षे ४ महिन्यांनंतर निर्णय

इचलकरंजी :
वहिफणी असोसिएशनने दरवाढीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली असून, यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. गेल्या तब्बल ४ वर्षे ४ महिन्यांपासून दरवाढ प्रलंबित होती. या कालावधीत मनपा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, मार्च एंड तसेच युद्धजन्य परिस्थितींमुळे चार वेळा दरवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. अखेर पॉवरलूम असोसिएशनमध्ये पाचव्या बैठकीत दरवाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली.
जिल्हाध्यक्ष महादेव गौड यांनी सांगितले की, खर्चीवाल्यांच्या आंदोलनाला असोसिएशनने आजपर्यंत सहकार्य केले असून, यापुढेही त्यांच्या मजुरीवाढीसाठी पूर्ण पाठिंबा राहणार आहे. उद्योग टिकवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष संतोष सावंत यांच्यासह राजाराम पोवार, विलास कोरवी, दिलीप चोथे, भाऊ सावंत, नागुताई लोंढे, महेश बागडे, विजय मुतालिक, संजय जगताप, दगडू खवरे, पिंटू जाधव, सुनील कोरवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा