आज इमनपाची सर्वसाधारण सभा; ३८ विषयांवर चर्चा,बायोमायनिंग कडे लक्ष
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवार ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता प्रशासकीय इमारतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत एकूण ३८ विषयांवर चर्चा होणार असून शहर विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.
विरोधकांनी सुरवातीपासून उपस्थित केलेल्या बायोमायनिंग कामकाजाविषयी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
सभेत इंदौरच्या धर्तीवर स्वच्छता मोहीम राबविणे, ई-बस सेवा सुरू करण्यासाठी मार्ग, थांबे, तिकीट दर व पदभरती निश्चित करणे, मालमत्ता कर सवलत, वाचनालय शुल्कवाढ, तसेच पाणीपुरवठा सेस रद्द करण्याबाबत प्रस्ताव मांडले जाणार आहेत.
याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल शिक्षण सुविधा, वृक्ष समिती स्थापन, बाजारपेठ इमारत उभारणी, तसेच विविध विकासकामांवरही निर्णय होणार आहे.
महापौरांच्या आदेशानुसार प्र. नगरसचिव राहुल पोटे यांनी ही सूचना जारी केली असून सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बायोमायनिंग विषय गाजला की गुंडाळला?
विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील, नगरसेवक संजय तेलनाडे यांनी बायोमायनिंग कामकाजा विषय सुरवातीच्या सभेत लावून धरले त्यानंतर मैल खड्ड्यावर जाऊन त्याची पाहणी करून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले,त्याबाबत नंतर प्रकरण एकाकी शांत कसे झाले,विरोधकांनी तो मुद्दा गुंडाळला का याबाबत शहरात उलटसुलट चर्चा असून हा विषय तडीस नेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
बायोमायनिंग फाईल पदाधिकारी यांना मिळत नाही.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी सदर फाईल मागवली असता सदर फाईल ही आयुक्तांच्या केबिनला असल्याची बाब पुढे आली,आरोग्य विभाग प्रमुख सदर फाईल आणण्यास गेले असता त्यांनाही रिकाम्या हाताने परतावे लागले मात्र स्थायी समिती सभापतींनाही फाईल मिळाली नाही.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





