इचलकरंजीत विवाहितेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल
इचलकरंजी :
मंगळवार पेठ परिसरात एका ३९ वर्षीय विवाहितेला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध इचलकरंजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परशुराम बाळू चव्हाण व अजय शामराव वर्डींगे (दोघे रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी परशुराम चव्हाण याने पीडित महिलेच्या व्हॉट्सॲपवर अश्लील संदेश पाठवून संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर ३० एप्रिल रोजी रात्री तो महिलेच्या घरात घुसून तिला पकडण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच तो निघून गेला, मात्र नंतरही मेसेजद्वारे त्रास सुरूच ठेवला.
दरम्यान, अजय वडींगे याने संगनमताने महिलेच्या चारित्र्यावर आक्षेपार्ह संभाषण करत त्याची ऑडिओ क्लिप ३ मे रोजी तिच्या मोबाईलवर पाठवली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता व आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मृणालिनी पाटील करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800



