ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी रेल्वे मार्ग रखडल्याने सुरेश प्रभू यांची खंत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी रेल्वे मार्ग रखडल्याने सुरेश प्रभू यांची खंत

इचलकरंजी :
इचलकरंजी-हातकणंगले या प्रस्तावित ८ किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खंत व्यक्त केली. येथील आपटे वाचन मंदिर येथे आयोजित व्याख्यानमालेसाठी आले असता इचलकरंजी रेल्वे कृती समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीने रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी निवेदन दिले. सत्कारानंतर बोलताना प्रभू यांनी, “इचलकरंजीसारख्या वस्त्रोद्योग नगरीला रेल्वे सुविधा अत्यावश्यक आहे. २०१७ मध्ये या मार्गाला मंजुरी देऊन सर्वेक्षणही पूर्ण झाले, मात्र प्रकल्प अद्याप रखडला आहे,” अशी नाराजी व्यक्त केली.
इचलकरंजी रेल्वे कृती समितीची स्थापना २०१२ मध्ये झाली. समितीच्या पाठपुराव्यानंतर २०१७ मध्ये या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली होती. प्रकल्पाचा डीपीआर व सर्वेक्षण पूर्ण झाले असून अर्थसंकल्पातही टोकन निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाने ५० टक्के निधी दिल्यास प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरेश प्रभू यांचे स्वागत करताना रेल्वे कृती समितीचे सदस्य

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा