ICHMH51NEWS.IN
9921600800

एमआरडीपी अंतर्गत इचलकरंजीच्या ४१९ कोटींच्या प्रकल्पास मान्यता,आ.राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एमआरडीपी अंतर्गत इचलकरंजीच्या ४१९ कोटींच्या प्रकल्पास मान्यता,आ.राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी
  महाराष्ट्र प्रतिसादकक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या ४१९ कोटी रुपयांच्या प्रकल्प प्रस्तावास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बुधवारी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्यास मदत होणार असून पावसाळ्यातील पाणी निचरा व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
इचलकरंजी शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते तसेच पंचगंगा नदीच्या पुरामुळे नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरून रस्ते व गटारींचे मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आधुनिक स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारणे, पूरनियंत्रण व पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता.
या प्रकल्पात काळा ओढा व चंदूर ओढ्याचे रुंदीकरण, गाळ काढणे, बॉक्स कल्व्हर्ट उभारणे, रस्त्याकडील ड्रेनेज व्यवस्था विकसित करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, डिटेन्शन पॉन्ड, कॉन्टूर ट्रेंचेस तसेच मियावाकी गार्डनसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांचा समावेश आहे. जागतिक बँक व ‘मित्रा’ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या प्रकल्पामुळे भविष्यात पूरस्थिती, पाणी साचणे व नाल्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा