ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीचे पाणी रोखण्याच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीचे पाणी रोखण्याच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

इचलकरंजी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या इचलकरंजी शहर शाखेच्या वतीने इचलकरंजी शहराचे पाणी रोखण्यासंदर्भात होत असलेल्या वक्तव्यांविरोधात तसेच बंद असलेल्या प्रोसेस उद्योग आणि शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग अनेक दिवसांपासून बंद असल्याने निर्माण झालेली आर्थिक अडचण, वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांचा प्रश्न आणि शहराचे पाणी रोखण्यासंदर्भातील वक्तव्यांमुळे वाढणारा तणाव याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी हा विषय गंभीर असून प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे असल्याचे सांगत योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी सांगितले की, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त व्हावी ही इचलकरंजीकरांचीही प्रामाणिक भूमिका आहे. मात्र प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली शहरातील नागरिक, कामगार आणि उद्योगांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने वेळेत प्रभावी उपाययोजना केल्या असत्या तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही त्यांनी नमूद केले.
मनसे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांनी इचलकरंजी शहराचे पाणी रोखण्याबाबत वक्तव्य करणारे आणि सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. शहरातील चार लाख जनतेच्या पाणीप्रश्नाशी खेळ करण्याचा कोणाचाही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, तालुका उपाध्यक्ष मनोहर जोशी, जिल्हा चिटणीस महेश शेंडे, प्रमोद परीट, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनायक मुसळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर, शहर उपाध्यक्ष नितीन कटके, अभिषेक सारडा, सौरभ सकपाळ, उत्तम पाटील, शारीरिक सेना जिल्हाध्यक्ष सुरज बेलेकर, ऋषिकेश मराठे, अनिल झाडबुके, रमेश पसलादी, अतुल जाधव, नरेंद्र गोंदकर, सिद्धार्थ अजेटराव, शहराध्यक्षा रसिका साळुंखे, सागर धुमाळ, मारुती वंजुरे, हेमा सावणुर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रांत कार्यालयात निवेदन देताना मनसे पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा