ICHMH51NEWS.IN
9921600800

राधाकृष्ण चौक सुशोभीकरणासाठी साईप्रसाद ग्रुपचा पुढाकार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राधाकृष्ण चौक सुशोभीकरणासाठी साईप्रसाद ग्रुपचा पुढाकार

इचलकरंजी :
शहरातील राधाकृष्ण चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी श्री साईप्रसाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील महाजन यांनी स्वखर्चातून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबतचे निवेदन आज इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांना प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेविका विजया सुनील महाजन यांनी दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून राधाकृष्ण चौक सुशोभीकरणाचा विषय प्रलंबित आहे. मात्र आता हे काम इचलकरंजी महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक भार न टाकता स्वखर्चातून करण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
उद्या होणाऱ्या कौन्सिल बैठकीत ऐनवेळेच्या विषयामध्ये हा प्रस्ताव घेऊन त्यास मंजुरी द्यावी व तात्काळ कामास सुरुवात करावी, अशी मागणी नगरसेविका विजया महाजन यांनी केली आहे.
यावेळी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक व विनय महाजन उपस्थित होते.

महापौर उदय धातूंडे यांना निवेदन देताना नगरसेविका विजया महाजन

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा