इचलकरंजी महानगरपालिकेत हिंसाचार व दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा
इचलकरंजी :
२१ मे हा दिवस देशभरात हिंसाचार आणि दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येत असून, त्यानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
महानगरपालिका मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात स्थायी समिती सभापती सतीश मुळीक आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली. समाजात शांतता, ऐक्य आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी तसेच हिंसाचार आणि दहशतवादाला विरोध करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, सहायक आयुक्त सुनील शिंदे, नितीन बनगे, रामचंद्र कांबळे, दीपक खोत, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख धनंजय पळसुले, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, उमेश कांबळे आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा करताना मनपा अधिकारी व कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






