ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार

इचलकरंजी:
श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी बोर्ड परीक्षेत उत्तम यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “बोर्ड परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहेच, परंतु त्याचबरोबर बाह्य जगाचे ज्ञान आणि व्यवहारिक अनुभवही संपादन करणे आवश्यक आहे. भविष्यातील यशासाठी व्यवहारिक ज्ञानाची जोड तितकीच महत्त्वाची ठरते.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून बारावी बोर्ड परीक्षा निकालाचे वाचन केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अनेक गुणवंत विद्यार्थिनींनी कॉलेजविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या यशामागील शिक्षक व पालकांचे योगदान अधोरेखित केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी यांनी विद्यार्थिनींना भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन मारूतराव निमणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उपमुख्याध्यापिका व्ही. एस. लोटके, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. पी. इंगळे यांनी केले, तर एस. एम. कवळेकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा प्रसंगी मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा