इचलकरंजीत डॉक्टर महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास
इचलकरंजी :
शहरातील चंदूर रोड परिसरात अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. प्रिती उमेश पिसे (वय ३१, रा. रुई, ता. हातकणंगले) या दि. २४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास चंदूर रोडवरील अलायन्स हॉस्पिटलजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंप परिसरात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने गळ्यातील सोन्याची चैन व पेंडंट चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्याचे वजन सुमारे ८ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत १ लाख १९ हजार २०० रुपये इतकी आहे.
याबाबत प्रिती पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





