इचलकरंजीत आयपीएल बेटिंग रॅकेटवर छापा; ५८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी :
इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील एका फुटवेअर गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन आयपीएल बेटिंग रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल ५८ लाख ९० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरी मंदिरासमोरील मनिषा एंटरप्रायझेस या फुटवेअर गोडाऊनमध्ये आरोपी park247.com व park333.com या संकेतस्थळांच्या माध्यमातून ग्राहकांना आयडी व पासवर्ड देऊन आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन बेटिंग खेळण्यास प्रोत्साहन देत होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यावर बेटिंग सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
छाप्यात ९ मोबाईल हँडसेट, एक लॅपटॉप, ७०,२३० रोख रक्कम तसेच ३ चारचाकी वाहने असा एकूण ५८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अमेय विलास बडवे, गणेश प्रकाश पाटील, अभिजित विलास बडवे, उत्तमसिंग बग्गा, याकुब मुजावर व रिषभ पाटील या सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून करण्यात आली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





