हाळवणकरांची मध्यस्थी,पालकमंत्र्यांची दांडी, मजुरीवाढ आंदोलन १५ दिवस स्थगित
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात गेल्या २३ दिवसापासून सुरू असलेल्या मजुरीवाढ आंदोलनास हिंसक वळण लागले होते,ट्रेडिंगधारकांच्या घरावर दगडफेक व त्यानंतर खर्चीवल्या नेत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांची ट्रेडिंगधारक व खर्चीवाले यंत्रमागधारक प्रतिनिधी यांनी भेट घेतल्यानंतर हाळवणकराणी याप्रश्नी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रांत कार्यालयात ट्रेडिंगधारक प्रतिनिधी व खर्चीवाले यंत्रमागधारक प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कलुषित झालेले वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी ट्रेडिंगधारकांनी आंदोलन महिनाभर स्थगित करावे असे मत मांडले तर खर्चीवाले प्रतिनिधी यांनी आजच तोडगा काढावा व अमंलबजावणी 15 दिवसांनी करा असा पवित्रा घेतला. दोन्ही बाजूनी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्यावर निर्णय सोपवला, म्हणणे ऐकून घेत माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी ८ जून रोजी दुपारी ५ वाजता याविषयीची बैठक घेऊन निर्णय करण्याच्या पर्यायास प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली असून तोपर्यत यंत्रमाग सुरू करावेत व कटुता कमी करावी असे ठरवण्यात आले.
यावेळी काही वेळ ट्रेडिंगधारक प्रतिनिधी व यंत्रमागधारक प्रतिनिधी यांच्यात खडाजंगी उडाली.उपस्थितानी मध्यस्थीने हातघाईवर आलेला वाद मिटला. यावेळी चंदनमल मंत्री,रामपाल भंडारी,घनश्याम इनानी,सुशील इनानी यांच्यासह खर्चीवाले प्रतिनिधी पुंडलिकभाऊ जाधव,विनय महाजन,शहाजी भोसले,नंदकुमार लोखंडे उपस्थित होते.
पालकमंत्री अनुपस्थित, हाळवणकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित.
शहराच्या वस्त्रोद्योगाशी निगडित महत्वाच्या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार होते मात्र ते अनुपस्थित राहिल्याने ते कुणाच्या फोनमुळे अनुपस्थित राहिले असावेत याची खमंग चर्चा हाळवणकर समर्थक करत होते.
प्रांत कार्यालयात बैठकीदरम्यान प्रांत दीपक शिंदे,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर व प्रतिनिधी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






