ICHMH51NEWS.IN
9921600800

आयपीएल बेटिंग प्रकरणात नगरसेवकासह तिघांना अटक, १०४ संगणकांसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आयपीएल बेटिंग प्रकरणात नगरसेवकासह तिघांना अटक, १०४ संगणकांसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी :
शहरातील अवैध आयपीएल ऑनलाईन बेटिंग प्रकरणात विशेष तपास पथक एसआयटी व शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत आज नगरसेवकासह तिघांना अटक केली असून, बेटिंगसाठी वापरण्यात येणारे १०४ संगणक संच जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे इचलकरंजीतील संघटित ऑनलाईन बेटिंग रॅकेट उघडकीस आले आहे.
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत काही इसम अवैध क्रिकेट बेटिंग व्यवसाय चालवत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. पथकाने तब्बल ३५ दिवस संशयितांवर पाळत ठेवून, रेकी करत नियोजनबद्ध कारवाई केली.
२४ मे रोजी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील भुवनेश्वरी मंदिरासमोरील “मनीषा एंटरप्रायजेस” या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी park247.com व park333.com या संकेतस्थळांच्या माध्यमातून ग्राहकांना आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देत ऑनलाईन आयपीएल बेटिंगसाठी प्रवृत्त करत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात आज नितेश उर्फ गोट्या किरण पोवार, मनीष भरत सांगावकर व सचिन सदाशिव हरगापुरे या तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला नितेश उर्फ गोट्या पोवार हा भाजपचा नगरसेवक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ऑनलाईन बेटिंगसाठी वापरण्यात येणारे १०४ संगणक संच, की-बोर्ड व सीपीयू असा सुमारे २६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम व चारचाकी वाहनांसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आतापर्यंत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८६ लाख ९३ हजार २३० रुपये इतकी झाली आहे.
अटक आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून,या बेटिंग नेटवर्कशी संबंधितापर्यत तसेच वेबसाईट तयार करणाऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवाजीराव गायकवाड उपस्थित होते.
बेटिंग प्रकरणात नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पोवारला न्यायालयात हजर करण्यात आले
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा