ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत बकरी ईद उत्साहात साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत बकरी ईद उत्साहात साजरी

इचलकरंजी-
इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी गुरुवारी पवित्र बकरी ईद (इद उल अजहा) मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता, बंधुता व अखंडता आणि जातीय सलोखा कायम राहून सर्व संकटे दूर व्हावीत यासाठी दुआपठण करण्यात आले.

नमाज पठण झालेनंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजात रमजान ईद बरोबरच बकरी ईद सण उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण केले जाते. मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते. अक्स मस्जिदचे  मुफ्ती युसूफ मोमीन यांनी बयान पठण तर नमाज व दुआ पठण गौसिया मस्जिदचे इमाम मौलाना आसिफ मोमीन यांनी केले. हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांचे वतीने नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा