ICHMH51NEWS.IN
9921600800

जलपदयात्रेच्या प्रारंभासाठी दुधगंगा नदीचे पवित्र जल इचलकरंजीत.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जलपदयात्रेच्या प्रारंभासाठी दुधगंगा नदीचे पवित्र जल इचलकरंजीत.

इचलकरंजी :
शहराच्या पाणीप्रश्नासाठी शिव-शाहू विकास आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जल पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासैनिकांनी सुळकुड येथील दुधगंगा नदीचे पवित्र जल इचलकरंजीत आणले.
शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील व युवासेना शहरसमन्वयक रतन वाझे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. उद्या गावभाग येथील महादेव मंदिरातील पिंडीस या पवित्र जलातून अभिषेक करून जल पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.
सुळकुड पाणी योजना लवकर कार्यान्वित व्हावी व इचलकरंजीकरांची तहान कायमस्वरूपी भागावी, ही प्रार्थना यावेळी करण्यात आली. ही पदयात्रा शहराच्या पाणीप्रश्नावर जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रद्धा व संघर्षाचे प्रतीक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी पवन मेटे, सागर जाधव, अरविंद मस्के, संतोष लवटे, अजित कोरवी आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा