जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलींद भोसले यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
इचलकरंजी येथे सुमारे तीन वर्षे कार्यरत असलेले जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलींद भोसले यांची मालेगाव (जि. नाशिक) येथे बदली झाल्यानंतर दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल व कार्यकारिणीच्या वतीने मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलींद भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. न्यायाधीश पी. एन. रोकडे, मा. न्यायाधीश डी. बी. साठे तसेच मा. न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमात मा. न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी, अॅड. ए. टी. तांबे, अॅड. एस. बी. सावेकर, बी. चव्हाण, अॅड. एस. एस. कुलकर्णी आणि अॅड. शैलेंद्र रजपूत यांनी मनोगत व्यक्त केले.
समारोपप्रसंगी उत्तर देताना मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलींद भोसले यांनी इचलकरंजीतील वरिष्ठ वकील नियमितपणे न्यायालयीन कामकाजात सहभागी होत असल्याचे कौतुक केले. तसेच बार आणि बेंच यांच्यातील समन्वय व सहकार्याचा विशेष उल्लेख करत समाधान व्यक्त केले.
यावेळी लेक्चर सिरीजमध्ये मार्गदर्शनासाठी सांगली येथून आलेले मास्टर ट्रेनर अॅड. चिराग सोनेचा यांचे स्वागत मा. न्यायाधीश मिलींद भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अॅड. डी. एम. लटके व अॅड. श्रद्धा आरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. हणबर मॅडम यांनी केले, तर आभार अॅड. विजय शिंगारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉइंट सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर तसेच कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, अॅड. अर्चना कुलकर्णी (ओगले), अॅड. किर्ती जैद, अॅड. सुरज ओगले, अॅड. धीरज पारख, अॅड. राजीव शिंगे, अॅड. इंद्रजित कांबळे (जयसिंगपूर), कोल्हापूर जिल्हा नोटरी संघाचे अध्यक्ष अॅड. अमित सिंग, क्लार्क प्रविणभाऊ फगरे आणि दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
न्यायाधीश मिलिंद भोसलेसो यांचा सन्मान करताना अँड राजगोपाल तोष्णीवाल
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





