आगामी लोकसभा-विधानसभेवर भगवाच; शिवसैनिकांनी तयारीला लागा : सुशांत शेलार
इचलकरंजी :
आगामी हातकणंगले लोकसभा आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन शिवसेना सचिव सुशांत शेलार यांनी शिवसैनिकांना केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी इचलकरंजीतील मातोश्री येथे प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले, “कोण काय तयारी करत आहे याकडे लक्ष देऊ नका. शिवसैनिकांनी संघटना मजबूत ठेवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे.” बीएलए संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हा निधी योग्य कामासाठी खर्च होऊन त्याचे श्रेय शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे व पुंडलिक जाधव यांनी शेलार यांचे स्वागत केले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे, निशिकांत पाटील, तालुकाप्रमुख उदय झुटाळ, सतीश मलमे आदी उपस्थित होते.
दरम्यान, “खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी ग्वाही रवींद्र माने यांनी दिली.
सुशांत शेलार यांचे स्वागत करताना जिल्हाप्रमुख रविंद्र माने,शहरप्रमुख भाऊसो आवळे व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




