डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांची टाटा पॉवरमध्ये ७.५ लाखांच्या दमदार पॅकेजवर निवड
इचलकरंजी:
डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सुरज बेडक्याळे, स्नेहल भोईटे व प्रतिक पांढरे यांची देशातील अग्रगण्य टाटा पॉवर कंपनीमध्ये रुपये ७.५ लाखाच्या आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणारी टाटा पॉवर ही कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाते.
टाटा पॉवर ही भारतातील आघाडीची उर्जा निर्मिती व वितरण क्षेत्रातील कंपनी असून उर्जा व्यवस्थापन, स्मार्ट पॉवर तंत्रज्ञान आणि अक्षय उर्जा क्षेत्रात कंपनीचे विशेष योगदान आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह उद्योगविश्वातील उच्च दर्जाच्या संधी उपलब्ध करुन देणारी ही कंपनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते.
डीकेटीई मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगाभिमुख शिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास, इंडस्ट्री व्हिजीट, इंडस्ट्री ट्रेनिंग तसेच आधुनिक तंत्रज्ञानावरील विषेश प्रशिक्षणावर भर दिला जातो. इलेक्ट्रीक विभागात इलेक्ट्रीक व्हेईकल, ऑटोमेशन, उर्जा तंत्रज्ञान, प्रोग्रॅमिंग आणि आधुनिक सॉफटवेअर प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची उद्योग क्षेत्रातील तयारी अधिक सक्षम होत आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ. आर.एन.पाटील, टीपीओ जी.एस.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील टाटा पॉवर कंपनीत निवड झालेले विद्यार्थी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





