ICHMH51NEWS.IN
9921600800

नव्या अग्निशमन वाहनामुळे इचलकरंजी अग्निशमन दलाची ताकद वाढली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नव्या अग्निशमन वाहनामुळे इचलकरंजी अग्निशमन दलाची ताकद वाढली

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेकडून महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान २०२४-२०२५ अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या नव्या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले. महानगरपालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या या वाहनामुळे अग्निशमन व आणीबाणी सेवांना अधिक बळकटी मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपमहापौर अनिल डाळ्या तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या अग्निशमन वाहनामुळे शहरातील आपत्कालीन परिस्थितींना अधिक प्रभावीपणे सामोरे जाणे शक्य होणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेवक राजू बोंद्रे, नगरसेवक अविनाश कांबळे, माजी नगरसेवक दिलीप मुथा, प्रमोद बचाटे यांच्यासह उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त विद्या कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त सुनिल शिंदे, सहायक आयुक्त रामचंद्र कांबळे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधीक्षक संजय शेटे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अग्निशमन दलाच्या वाहनाचे उद्घाटन करताना खासदार धैर्यशील माने,आ.राहुल आवाडे व पदाधिकारी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा