सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी शिवसेनेचा मेळावा
इचलकरंजी :
राज्यातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग-व्यवसाय क्षेत्राकडे वळावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योग मेळाव्याचे आयोजन महेश क्लब ऑफ इचलकरंजी येथे करण्यात आले. या मेळाव्यात शिवसेना उपनेते व मुख्य सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी तरुणांना उद्योजक बनण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यातील तरुणांना उद्योजक बनवण्याचा संकल्प आहे. तरुणांनी रोजगार शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे बनावे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना, आर्थिक साहाय्य व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून केला जात आहे.
मेळाव्याचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक रवींद्र माने यांनी केले होते. प्रास्ताविकात त्यांनी शिवसेना समाजकारणाला प्राधान्य देत असून तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मेळाव्यात महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्रीनिवास जयदीप कवाडे यांनी मार्गदर्शन केले. उद्योगासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य, शासकीय योजना, सुविधा व व्यवसायाच्या संधींबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी वैशाली डोंगरे यांच्यासह उद्योजक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना सह प्रवक्ते राजु वाघमारे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







