बिल्डर्स असाेशिएशन इचलकरंजी सेंटरचे कार्य काैतुकास्पद : रवींद्र त्यागी
इचलकरंजी:
बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडियाचा भाग असलेल्या इचलकरंजी सेंटरचे बांधकाम क्षेत्रातील कार्य काैतुकास्पद असून या क्षेत्रातील प्रत्येक घटकांसाठी या सेंटरने सातत्याने उल्लेखनीय काम केले आहे, असे गाैरवाेद्गार बिल्डर्स असाेशिएशन ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय प्रेसिडेंट रविंद्र त्यागी यांनी काढले.
देशभरातील बांधकाम क्षेत्रातील काॅन्ट्रॅक्टर, गव्हर्मेंट काॅन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, बिल्डर्स, आरएमसी, फॅब्रिकेटर्स, सॅनिटरी वेअर आदींची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या सन २०२६-२८ या सालच्या नुतन पदाधिकाèयांच्या पदग्रहण साेहळ्यात ते बाेलत हाेते. याप्रसंगी राज्य चेअरमन प्रकाश मेंडा यांची प्रमुख उपस्थित हाेती.
प्रारंभी स्वागत मावळते प्रेसिडेंट फैयाज गैबान यांनी स्वागत केले. तर ट्रस्ट चेअरमन नितीन धुत यांनी गत दाेन वर्षातील फैयाज गैबान यांच्या कार्याचा आणि भविष्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा विस्तृत आढावा घेतला.
बिल्डर्स असाेशिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रासाठी असलेल्या विविध याेजनांचा लाभ काॅन्ट्रॅक्टना व कामगारांना मिळवून द्यावा, असे आवाहन आमदार डाॅ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. आमदार राहुल आवाडे यांनी, पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देशातील इन््रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हाेत आहे. त्याद्वारे बिल्डर्स असाेशिएशन ऑफ इंडियाने राज्यभरातील सेंटरच्या सहकार्याने बांधकाम क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. भविष्यातही या असाेशिएशनच्या अडचणी साेडविण्यासाठी आवश्यक त्या सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी इचलकरंजी सेंटर चेअरमन शितल काजवे, व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंत्रे, सेक्रेटरी पुंडलिक जाधव, जाॅ. सेक्रेटरी दिलीप पटेल, ट्रेझरर श्रीकांत लास्कर आणि जयसिंगपूर सेंटरचे चेअरमन मिलिंद साखरपे यांचा पदग्रहण साेहळा संपन्न झाला. नुतन चेअरमन शितल काजवे यांनी, सर्वांच्या सहकार्यातून बिल्डिंग असाेशिएशनच्या उत्तुंग कार्याची परंपरा कायम ठेवण्याची ग्वाही दिली. तर मिलिंद साखरपे यांनी, शासन दरबारी बिल्डर्स असाेशिएशन प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार राहुल आवाडे व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
याप्रसंगी प्रताप साळुंखे यांनी मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमास माेहन सातपुते, संजय रुगे, तानाजी हराळे, भगवान कांबुरे, पन्नालाल डाळ्या, शिवाजी पाेवार, विकास चंगेडीया, सुहास अकिवाटे, महांतेश काेकळकी, प्रल्हाद माने, स्वप्निल शहा, शिवकुमार हिराणी, मयुर शहा, श्रीकांत रुगे, संजय घायतिडक, रमेश मर्दा, राजेंद्र खंडेराजुरे, महेश महाजन, सुधीर लाटकर उपस्थित हाेते.
बिल्डर्स असाेशिएशन इचलकरंजी सेंटर पदाधिकाèयांच्या पदग्रहण साेहळ्याप्रसंगी रविंद्र त्यागी, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, पकाश मेढा शितल काजवे, मिलिंद साखरपे, नितीन धुत, फैयाज गैबान पताप साळूखे आदी मान्यवर.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








