ICHMH51NEWS.IN
9921600800

अवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावा

पट्टणकाेडाेली:
अल निनाे इेक्टच्या अनुषंगाने येणाèया हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहून अवर्षण परिस्थीती निर्माण हाेण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या ऊस विकास याेजनेअंतर्गत अवर्षण परिस्थितीत ऊस पीक नियाेजन मार्गदर्शन शेतकरी मेळावा श्री कल्लेश्वर मंदीर पट्टणकाेडाेली येथे नुकताच संपन्न झाला.
प्रास्ताविकात जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे यांनी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे व आमदार राहूल आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार कारखाना स्थापनेपासून विविध ऊस विकास याेजनेच्या माध्यमातून बिनव्याजी क्रेडीटवर अनुदानासहं विविध निवीष्ठा पुरवित असून वेळाेवेळी मार्गदर्शन कार्यशाळा घेत असल्याचे सांगीतले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. जे. एम. रेपाळे यांनी, हिरवळीची खते, शेणखत, गांडूळ खत व पाचटाचा वापर इत्यादी मधून जमिनीचा सेंद्रीय कर्ब हा किमान 0.80 ते 1 टक्यांपर्यंत राखल्यास कमी पाण्यात ऊस पिकाची चांगली वाढ हाेते. तसेच कारखान्याने शिारस केलेल्या ऊस जातींचे प्रमाणित बियाणे व ऊस राेपांची लागवड करावी. याकरिता कारखान्याच्या बियाणे प्लाॅटमधील ऊस बियाण्याचा व कारखाना मान्यताप्राप्त ऊस राेपवाटीकांमधील ऊस राेपांचा वापर करावा. अवर्षण परिस्थितीत तग धरून राहण्याकरिता व्ही.एस.आय. 8005 ही ऊस जात अत्यंत चांगली आहे. ही ऊस जात पाण्याचा ताण सहन करते तसेच या जातीस तुरा देखील लवकर येत नाही. अवर्षण काळात पाण्याचे नियाेजन झालेनंतरच रासायनिक खतांचे डाेस द्यावेत असे सांगीतले तसेच त्यांनी ‘खेत बचायाे अभियानाच्या‘ उद्देशाबाबत मार्गदर्शन केले.
शास्त्रज्ञ डाॅ. जी. एस. काेटगिरे यांनी अवर्षण परिस्थितीत बाष्पीभवनाच्या प्रमाणात वाढ हाेवून ऊस पिकात हरितद्रव्य तयार हाेण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे ऊसाच्या वाढीला मर्यादा येतात. याकरिता ठिबक सिंचन हे अत्यंत प्रभावी नियाेजन आहे, तसेच पाचट आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते. अवर्षण काळात वसंत उर्जा, सुक्ष्मअन्नद्रव्ये व सिलीकाॅनची फवारणी ड्राेनद्वारे करावी. यामुळे पिकांच्या पानांवर सुरक्षा कवच तयार हाेवून बाष्यिभवनाचा वेग कमी हाेताे. तसेच राेग व किडींपासून संरक्षण हाेते. कारखान्याने या सर्व उपाययाेजना ऊस विकास याेजनेतून उपलब्ध करून दिल्या असून त्याचा शेतक-यांनी लाभ घेऊन अवर्षण काळातही ऊस पिकाचे चांगले उत्पादन घेणेविषयी सांगीतले.
ऑगष्ट 2025 पासून कारखान्याचे 158 शेतकरी 104 हेक्टर ऊस क्षेत्रावर अश्र तंत्रज्ञानाचा वापर करीत असून नियमित ठिबक सिंचन प्रणालीपेक्षा सरासरी 25 टक्के कमी पाण्यात ऊस पिकाची चांगली वाढ हाेत असलेबाबत यळगुड व हुपरी येथील सहभागी शेतक-यांनी सांगीतले. सिनियर अ‍ॅग्री ओव्हरसियर अजित चाैगुले यांनी अवर्षण परिस्थीतीमध्येही अश्र तंत्रज्ञानाचा वापर करून, माेजक्या पाण्यात ऊसाचे चांगले उत्पादन घेता येणे शक्य आहे. याकरिता ठिबक सिंचन संच कार्यान्वित असणा-या इच्छुक सभासद शेतक-यांनी शेती सर्कल/गट ऑीस मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चाैगुले, संचालक प्रकाश पाटील, सूरज बेडगे, माजी संचालक शेखर पाटील, पैसांड बँकेचे चेअरमन आण्णासाे भाेजे, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, शेती स्टाफ व शेतकरी उपस्थित हाेते. शेवटी केन कमिटी चेअरमन दादासाे सांगावे यांनी आभार मानले.

मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा