ICHMH51NEWS.IN
9921600800

गृहमंत्री अमित शहा २१ जूनला इचलकरंजीत,आ.राहुल आवाडे यांची माहिती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गृहमंत्री अमित शहा २१ जूनला इचलकरंजीत,आ.राहुल आवाडे यांची माहिती

इचलकरंजी
भाजपाचे ज्येष्ठ नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा हे रविवार २१ जून रोजी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात येणार असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली. त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांसोबतच जंगी जाहीर सभाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखन्याचा नामविस्तार आणि इचलकरंजीतील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या नुतन मुख्य इमारतीचे उद्घाटन नामदार अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जंगी जाहीर सभाही घेण्यात येणार आहे. या दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील प्रमुख नेतेमंडळी असणार आहेत. पावसाळ्याचा काळ लक्षात घेता त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा