ICHMH51NEWS.IN
9921600800

राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल व विद्यानिकेतन शाळा क्र. २७ मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल व विद्यानिकेतन शाळा क्र. २७ मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल व विद्यानिकेतन शाळा क्र. २७ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास शिक्षण समितीच्या सभापती सौ. विद्या मनोज साळुंखे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले तसेच गुलाब फुलांची उधळण, आकर्षक रांगोळी, फुग्यांची सजावट आणि डिजिटल बोर्डच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुण्या सौ. विद्या साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. शंकर पोवार, पी. ए. पाटील, माने सर, देमाण्णा सर, दिवटे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. शंकर पोवार यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. ए. पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

नवोगतांचे स्वागत करताना सभापती विद्या साळुंखे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा