ICHMH51NEWS.IN
9921600800

आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

इचलकरंजी :

इचलकरंजी महानगरपालिका संचालित डॉ. सरोजिनी नायडू शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सकारात्मक आणि आनंददायी सुरुवात व्हावी, या उद्देशाने विशेष स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात आयुक्त पल्लवी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ देत त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी नियमित उपस्थिती ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही आनंदी वातावरणात शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली.

यानंतर आयुक्तांनी शाळेतील विविध सुविधा, स्वच्छता आणि शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्या शालेय जीवनाची आनंददायी सुरुवात झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा