प्रबोधिनीच्या वतीने जयकुमार कोले यांचा सत्कार
इचलकरंजी:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तसेच समाजवादी प्रबोधिनीचे स्थापनेपासूनचे ज्येष्ठ सहकारी जयकुमार कोले यांना नुकताच नांगरट साहित्य संमेलनात” स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार ” आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या जीवनगौरव पुरस्काराबद्दल समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने त्यांचा प्रसाद कुलकर्णी आणि शशांक बावचकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जयकुमार कोले यांनी कबनूरचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य म्हणून भरीव स्वरूपाचे कार्य केलेले आहे. तसेच कबनूर एज्युकेशन संस्थेच्या सर्वांगीण विस्तारात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार शेती, संघटन, प्रबोधन अशा अनेक क्षेत्रात गेली साठ वर्षे सक्रिय राहून निस्पृह भावनेने योगदान दिले आहे. समाजाच्या सर्वक्षेत्रात अतिशय सन्माननीय स्थान असलेल्या अशा या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणे ही अतिशय दखलपात्र व आनंदाची घटना आहे अशी भावना यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मिलिंद कोले,अन्वर पटेल, प्रा. रमेश लवटे ,पांडुरंग पिसे, अशोक केसरकर, रवींद्र पाटील, रामदास कोळी,शिवाजी शिंदे, सचिन पाटोळे, राजन मुठाणे,अजित मिणेकर, महेंद्र जाधव, नौशाद शेडबाळे , प्रा. राकेश शेटके, देवदत्त कुंभार आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





